Subscribe Us

header ads

अत्याचार पिडीतेच्या मुलीच्या गेवराई तालुक्यातील गावात महिला आयोगाच्या सदस्या अॅड संगिता चव्हाणांनी दिली भेट

बीड स्पीड न्यूज 


अत्याचार पिडीतेच्या मुलीच्या गेवराई तालुक्यातील गावात

 महिला आयोगाच्या सदस्या अॅड संगिता चव्हाणांनी दिली भेट

 

आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या पोलिसांना सूचना

तर पोलिस अधीक्षकांशी साधला थेट संवाद

 

 

बीड, दि.10 :- गेवराई तालुक्यामध्ये एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्या अॅड. संगीता चव्हाण यांनी गेवराई तालुक्यात थेट गावात घटनास्थळी भेट घेऊन दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना तर दिल्या. ग्रामस्थांनी दिलेले  निवेदन स्विकारुन या अनुषंगाने तातडीने कारवाई व्हावी यासाठी थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला.राज्य महिला 

आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण म्हणाल्या की, घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आरोपीला कठोरात कठोर शासन देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या घटनेच्या अनुषंगाने पीडित चिमुरडीच्या पालकांना हवी ती मदत मी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी वचन दिले. तसेच त्यांनी पोलिसांना सूचना देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याचे सांगितले.राज्य महिला आयोगाच्या सदस्य ॲड. संगीता चव्हाण घटनास्थळी भेट दिली यावेळी विविध सामाजिक संघटनांचे सदस्य व ग्रामस्थांनी ॲड. श्रीमती चव्हाण यांना निवेदन देऊन आरोपीला तात्काळ अटक करून शिक्षेची मागणी केली.

 

पोलिस अधीक्षकांनी स्वतः  केले संतप्त जमावाला शांत

 

ग्रामस्थांनी तात्काळ आरोपीस अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली. याप्रसंगी ॲड. श्रीमती चव्हाण यांनी थेट पोलीस अधीक्षकांना मोबाईल द्वारे संपर्क साधला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी मोबाईल द्वारे दोन दिवसांमध्ये आरोपीला अटक करण्यात येईल, तेव्हा कोणीही कायदा हातात न घेता सर्वांनी शांत व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केल्याचे  महिला आयोगाच्या सदस्या ॲड. श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड.  संगीता चव्हाण यांच्या समवेत पूजा मोरे, फरजाना ताई शेख यांच्या सह पदाधिकारी. कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा