Subscribe Us

header ads

फुले-आंबेडकर विचारधारेच्या प्रबोधन शिबीरास उपस्थित रहा:अनिल डोंगरे

बीड स्पीड न्यूज 


फुले-आंबेडकर विचारधारेच्या प्रबोधन शिबीरास उपस्थित रहा:अनिल डोंगरे

बीड / प्रतिनिधी-: कालकथित आनंदा सोनवणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी सम्राट अशोक सभागृह तागडगाव ता. शिरूर कासार येथे एकदिवशीय फुले- आंबेडकर विचाराचे प्रबोधन शिबीर ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्ञानक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व सतीश बनसोडे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला फुले- आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.चळवळीचे अंग असणारे तसेच अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख असलेले सुधाकर सोनवणे यांनी त्यांच्या वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त तागडगाव ता. शिरूर कासार जी बीड येथे एक दिवशीय प्रबोधन शिबीर ठेवले आहे. या फुले- आंबेडकर विचारधारेच्या प्रबोधन शिबीरामधून कार्यकर्त्यांना चळवळीत काम करण्याची एक दिशा मिळणार आहे. कार्यकर्त्यांना बौद्धिक प्रगल्भ करण्यासाठी हे शिबीर निर्णायक ठरणार आहे. या शिबिरात फुले- आंबेडकर तत्वज्ञानातत पारंगत असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व सतीश बनसोडे औरंगाबाद, हे विविध विषयावर मांडणी करणार असल्याचे अनिल डोंगरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जगाच्या निर्मितीसाठी सर्व प्रथा- परंपरा नाकारून या प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम चार सत्रामध्ये होणार असून पहिल्या सत्रात 'धम्म आणि धर्मातला फरक समजून घेऊ या' या महत्वपूर्ण विषयावर उहापोह करण्यात येणार आहे. या सत्राला प्रमुख उपस्थिती भन्ते धम्मशिल यांची असून युवराज सोनवणे, सतीश बनसोडे, गौतम वाघमारे यांचा या सत्रात सहभाग आहे.'फुले- आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी' या विषयावर सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदिप उपरे, बाबासाहेब मोरे, डॉ. अशोक गायकवाड, सुभाष साळवे हे मांडणी करणार आहेत. या सत्रात भन्ते धम्मशिल, मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, समता सैनिक दलाचे प्रमुख तथा बीडच्या मुख्य पोष्ट ऑफिसचे पोष्ट मास्तर अमरशिह ढाका यांचा विशेष सहभाग असणार आहे. 'डॉ. आंबेडकरांचा धम्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आजच्या नवबौद्धांच्या वास्तविक जीवनपद्धतीत अपेक्षित बदल' या विषयाची मांडणी सतीश बनसोडे हे करणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल डोंगरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा