Subscribe Us

header ads

विनयभंगाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता; अँड.व्हि.आर.कुलकर्णी यांनी आरोपीची मांडली बाजू....

बीड स्पीड न्यूज 


विनयभंगाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता. अँड.व्हि.आर.कुलकर्णी यांनी आरोपीची मांडली बाजू....


केज दि.२४ ( प्रतिनिधी ) जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपीने वाईट हेतूने एका २८ वर्षिय महिलेच्या हाताला धरून तिचा विनयभंग करत आरोपीने व त्याच्या पत्नीने सदर महिलेला लोंखडी गजाने पाठीत व डोक्यात बेदम मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याच्या  आरोपातून केज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायधिश ए.व्हि.देशपांडे यांनी दोघा आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी असलेल्या एका २८ वर्षिय महिलेला आरोपी व्यंकट वैजनाथ मुळे व त्याची पत्नी सुवर्णमाला व्यंकट मुळे या दोघा पती पत्नीने जुन्या भांडणाचे कारणावरून दि.५-२-२०१७ रोजी जुन्या भांडणाची कुरापत काढून सदर फिर्यादी महिलेला लोंखडी गजाने डोक्यात व पाठीत बेदम मारहाण करत आरोपी व्यंकट यांने वाईट हेतूने सदर महिलेच्या हाताला धरून विनयभंग केल्याची फिर्याद सदर महिलेने दिल्यावरुन वरील दोघा पती पत्नी विरोधात केज पोलीस ठाण्यात गु.र.न.५७/२०१७ कलम ३५४,३५४अ,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा केज पोलिसांनी पुढील तपास पूर्ण करुन तपासाअंती दोघा पती पत्नी विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदाराचे जबाब नोंदवले होते.परंतु न्यायालयाने साक्षीदाराचे जबाब आणि सबळ पुराव्या अभावी दोघा पती-पत्नीची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपीची बाजू  अँड.व्हि.आर.कुलकर्णी यांनी भक्कम पणे मांडल्यामुळे न्यायालयाने दोघाही आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा