Subscribe Us

header ads

बीड जिल्हा न्यायालयात व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न

बीड स्पीड न्यूज 



बीड जिल्हा न्यायालयात व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय

संपन्न राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्हयात 2136प्रकरणे निकाली

14 कोटी 95 लाख 57 हजार 805 रूपयांची तडजोड

 

बीड| प्रतिनिधी दि. 9 -: 7 मे 2022 रोजी जिल्हा न्यायालय, बीड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड व जिल्हा वकील संघ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत शं. महाजन यांनी आपआपसातील वाद, तंटे सामोपचाराने व सामंजस्याने मिटवावेत. तसेच या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवलेली जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन केले.या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्ह्यात एकुण प्रलंबीत 28359 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1114 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तसेच दाखलपूर्व 18638 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1022 प्रकरणे निकाली निघाली आहेत. असे एकुण 2136 निकाली निघाली आहेत.प्रलंबित प्रकरणात 11 कोटी 2 लाख 39 हजार 898 रूपये व दाखलपुर्व प्रकरणात 3 कोटी 93 लाख 30 हजार 907 रूपये असे या राष्ट्रीय 

लोकन्यायालयामध्ये एकुण रक्कम 14 कोटी 95 लाख 70 हजार 805 रूपयांची तडजोड करण्यात आली. तसेच दि. 2, 4, 5, 6 मे 2022 रोजी झालेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकुण 736 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 531 प्रकरणे निकाली निघाली आहेत.सदरील राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास मा. जिल्हाधिकारी, धिकारी/कर्मचारी, मा. न्यायीक अधिकारी, मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, सुरक्षा/पोलीस अधिकारी/कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी, बॅंकाचे, पतसंस्थेचे, विमा कंपनीचे अधिकारी/कर्मचारी, महावितरण कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अधिक्षक बी. बी. झंवर व सर्व न्यायालयातील न्यायीक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या सर्वाचे आभार  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव, सिध्दार्थ ना. गोडबोले, बीड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा