Subscribe Us

header ads

बिग बजेट संविधान चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित फ्लिम मेकर बीडच्या व्ही. सत्तूची चित्रपट क्षेत्रात गरुडझेप

बीड स्पीड न्यूज 

बिग बजेट संविधान चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
फ्लिम मेकर बीडच्या व्ही. सत्तूची चित्रपट क्षेत्रात गरुडझेप




बीड / प्रतिनिधी-: क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंट निर्मित दंडम चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर बीडचे भूमिपुत्र व्ही. सत्तू आता बिग बजेट असलेला संविधान हा  हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपट घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने  बीड येथील हॉटेल द कस्टल एक्सिक्युटिव्ह येथे रविवार (ता.८) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान चिपत्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. व्ही. सत्तु यांनी सुरुवातीपासूनच चित्रपट क्षेत्रात जोरदार एंट्री करून आपल्या नावाचा ठसा चित्रपट क्षेत्रात उमटवलेला आहे. आता त्यामध्ये आणखीन बिग बजेट संविधान चित्रपटाची भर पडणार आहे. एकंदरीत संविधान या चित्रपटाची कथा प्रत्येक नागरिकांच्या जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. बीडच्या व्ही. सत्तूने चित्रपट क्षेत्रात घेतलेली गरुडझेप कौतूकास्पद आहे.करिअरच्या टप्प्यावर कोणतेही काम अथवा एखादी कलाकृती उभा करणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी अथक संघर्ष आणि कष्ट उपसावे लागतात. त्यानंतरच  त्या व्यक्तीला लौकिक व मान सन्मान मिळत राहतो. चित्रपट बनविण्याचे कोणतेही शिक्षण नसताना चित्रपट बनविणे व तो रिलीज करणे कधी-कधी मोठे आव्हानात्मक ठरते. मात्र असे असताना दंडम सारखा बिग बजेट ऍक्शन चित्रपट प्रदर्शित करून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणारे व्ही. सत्तू  आता अतिशय महत्वाचा विषय घेऊन संविधान नावाचा चित्रपट बनवीत आहेत. त्या चित्रपटाचे नाव आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतले मोठं-मोठे कलाकार घेऊन संविधान हा चित्रपट मेकिंग केला जात आहे. येत्या एप्रिल २०२३ मध्ये हा संविधान चित्रपट देशातल्या सर्व टॉकीजमध्ये एकाचवेळी रिलीज होणार आहे. या संविधान चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शित कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे यांनी केले. सदरील पोस्टरचे लॉन्चिंग क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंटचे प्रमुख तथा चित्रपटाचे निर्माता व्ही.सत्तू, डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत शंकर विटकर, बसपा नेते प्रशांत वासनिक, अंकुश राठोड, अनिल कैवाडे,अमोल अंकुटे, दंडम टीम, हम है हिंमत वाले टीम, बीड मधील कलावंत, जय यश स्टुडिओ टीम, गोल्डन लाईट स्टुडिओ टीम, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.  संविधान चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रम यस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रिएटिव्ह माईंड फिल्म एंटरटेनमेंट टीममधील अक्षय बहिर यांच्यासह आदींनी मोलाचे परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा