Subscribe Us

header ads

अशीही ईमानदारी, दुरुस्तीसाठी आलेल्या कुलरमध्ये सापडलेले चक्क एक लाख परत करुन ठेवला आदर्श -- मुबारक चाउस यांच्या ईमानदारीला सलाम.

बीड स्पीड न्यूज 


अशीही ईमानदारी, दुरुस्तीसाठी आलेल्या कुलरमध्ये सापडलेले चक्क एक लाख परत करुन ठेवला आदर्श 
-- मुबारक चाउस यांच्या ईमानदारीला सलाम.

माजलगांव|प्रतिनिधी-: "ईमानदारीची दुनियाच राहिली नाही ‘‘ असे वारंवार आजु बाजुला घडणा-या घटनांवरुन बोलले जाते मात्र या जगात ईमानदारी अजुनही जिवंत असुन याचाच प्रत्यय येथील नवनाथ पवार या शेती व्यवसाय करणा-या व्यक्तीला आला. दुरुस्तीसाठी आलेल्या कुलरमधुन सापडलेले चक्क एक लाख रुपये दुकानदार मुबारक चाउस यांनी परत केल्याने पवार यांचा आनंद गगणात मावत नव्हता तर कांहीतरी चांगले आपल्या हातुन घडल्याचे समाधान मुबारक चाउस वाटत होते. चाउस यांच्या ईमानदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.माजलगांव शहरातील हनुमान चैक भागात चाउस इलेक्ट्रीकल हे कुलर पंखे व इतर इलेक्ट्रीकल साहित्याचे दुकान आहे. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे अनेक कुलर या ठिकाणी दुरुस्तीसाठी येतात. असेच एका ग्राहक चा  आलेले कुलर दुरुस्तीसाठी उघडत असतांना त्यात 500 रुपयांचे चक्क दोन बंडल आढळुन आले. चोरीच्या भितीने पैसे सुरक्षीत रहावे म्हणुन शेतकरी नवनाथ पवार यांनी ते कुलरमध्ये ठेवले होते. परंतु अनावधानाने कुलर दुरुस्तीसाठी पाठवल्यानंतरही त्यांच्या ही बाब लक्षातच राहिली नाही. कुलर उघडताच त्यातुन चक्क एक लाख रुपये मिळाल्यानंतर याची कल्पना तात्काळ कुलर मालकाला चाउस यांनी दिली व त्यांना दुकानावर बोलावुन घेवून ही रक्कम परत केली. अनावधानाने दुरुस्तीच्या वेळी विसरुन राहिलेली रक्कम परत मिळाल्यामुळे पवार यांनी चाउस यांचे धन्यवाद व्यक्त केले तसेच चाउस यांच्या ईमानदारीबददल सर्वस्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा