Subscribe Us

header ads

गुंगीचे औषध देऊन लुटणारे मामा भाच्याला केज पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मुद्देमाल घेतला ताब्यात.

बीड स्पीड न्यूज 


गुंगीचे औषध देऊन लुटणारे मामा भाच्याला केज पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मुद्देमाल घेतला ताब्यात.


केज|प्रतिनीधी-: केज येथून एका ६६ वर्ष वयाच्या वृद्धाला थंड पेय आणि केळीतून गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या होत्या. त्या प्रकरणातील आरोपी मामा भाच्याला ताब्यात घेत त्यांनी काढून घेतलेल्या दोन्ही अंगठ्या पोलिसानी हस्तगत करून अत्यंत आव्हानात्मक तपास पूर्ण केला आहे. या बद्दल केज पोलिसांचे कौतुक होत आहे.या घटनेची माहितदिi अशी की. ५ एप्रिल मंगळवार रोजी केज तालुक्यातील धर्मराज थोरात हे कानडी रोड लगतच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० चा. च्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे. अशी बतावणी केली. पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला. थोरात याना तो अनोळखी व्यक्तीने स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले. नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदी मधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला होता.दरम्यान दि. १ मे रोजी एका गुप्त खबऱ्याने नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना एका संशयित इस्माची माहिती दिली. त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणि तपासी अधिकारी राम यादव यांनी राजेंद्र बिरू लांडगे संशयित इस्मास ताब्यात घेतले आणि त्या नंतर त्याचा भाचा अमोल गोविंद सोनटक्के यालाही ताब्यात घेतले.दि. ७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार राम यादव आणि पोलीस नाईक अमोल गायकवाड यांनी अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहिती आधारे अधिक तपास करून औसा येथील एका रोहिणी अलंकार मध्ये त्यांनी अंगठ्या विकल्या असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार राम यादव आणि पोलीस नाईक अमोल गायकवाड आणि औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्या मदतीने सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा