Subscribe Us

header ads

देणार्‍याचे हात हजारो... माजलगाव येथील युवकाने गरजवंताला मदत करून जोपासली सामाजिक बांधिलकी

बीड स्पीड न्यूज 


देणार्‍याचे हात हजारो... माजलगाव येथील युवकाने गरजवंताला मदत करून जोपासली सामाजिक बांधिलकी

माजलगाव/प्रतिनिधी-: समाजात वावरत असतांना अनेक गोष्टी समोर येतात. कधी याचना करणारा गरीब माणूस किंवा वृद्ध नागरिक तर कधी दिव्यांग व्यक्ती दिसून येतो. अशावेळी आपण काही मदत करावी असे अनेकांना वाटते. परंतू परिस्थिती तेवढी चांगली नसल्याने मदतीचा हात आखडता घ्यावा लागतो. माजलगाव येथे असा एक युवक आहे जो प्रसंग पाहून मदतीचे हात पुढे करतो. बुधवार दिनांक 18 मे रोजी औरंगाबाद येथे नोकरी करीत असल्याने अशा अनेक गोष्टी समोर आल्या म्हणून अनाथ लहान मुलांना उन्हाळयात पायाला जखमा होवू नयेत म्हणून शेकडो चप्पलांचे जोड दिले आहेत. एवढेच नाही तर उन्हाच्या त्रासापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर 

मायेचा हात ठेवण्यासोबत टोप्यासुद्धा दिल्या आहेत.माजलगाव येथील लिंगायत हटगर कोष्टी समाजाचे अध्यक्ष नितीन जुजगर हे मागील काही वर्षापासून  विविध भागात लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत ज्यांना जी मदत अपेक्षित आहे ती मदत करीत आहेत. उन्हाळयाच्या दिवसात अनवाणी फिरणार्‍या लहान मुलांना चपला, थंडीमध्ये रस्त्यावर कुडकुडणार्‍या वृद्धांना उबदार वस्त्र तर कधी पिण्याचे पाणी आणि अन्न नितीन जुजगर यांनी वेळावेळी दिले आहे. लहान मुले खर्‍या अर्थाने देवा घरची फुले असतात परंतू या फुलांना सांभाळण्याची गरज लक्षात घेवून मी 

मदत करतो असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्व मदत स्वःखर्चातून ते करीत असून देणार्‍याचे हात हजारो असतात या शब्दाची प्रचिती या मदतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आली. मदत करणे हे काही उपकार नाहीत तर ती प्रेमाची आणि समोरच्या परिस्थितीला ओळखून घेण्याची संवेदना असते. मला सुचले म्हणूनच मी ही मदत करीत असल्याचे नितीन जुजगर यांनी सांगितले. औरंगाबाद येथे नोकरी करीत असल्याने अशा अनेक गोष्टी समोर आल्या म्हणून अनाथ लहान मुलांना उन्हाळयात पायाला जखमा होवू नयेत म्हणून शेकडो चप्पलांचे जोड दिले आहेत. एवढेच नाही तर उन्हाच्या त्रासापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर मायेचा हात ठेवण्यासोबत टोप्यासुद्धा दिल्या आहेत.दरम्यान या आगळया वेगळया मदतीचे सर्वत्र कौतूक होत असून अशा दानशूर व्यक्तीमुळे समाज व्यवस्था टिकून आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा