Subscribe Us

header ads

मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना या राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना या राजे यशवंतराव होळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित 



बीड (प्रतिनिधी) - शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा रोशनपुरा च्या मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना यांना राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षिका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.मुनव्वर सुलताना या शैक्षणिक पातळीवर अभ्यासासह विद्यार्थ्यांकरीता सतत वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबवित असतात. शिक्षण क्षेत्रात त्यांची एक तळमळीच्या शिक्षिका म्हणून ओळख आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या विशेष कार्याची नोंद घेऊन यापूर्वीही त्यांना जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षीका पुरस्कार, रोटरी क्लब चा आदर्श शिक्षिका पुरस्कार, मैत्रा फाउंडेशन कडून ही आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यावेळी ही नुकतेच शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार आयोजकांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा