Subscribe Us

header ads

घरकुलाची प्रलंबीत कामे १३ जून पर्यंत पूर्ण करा - सीईओ अजित पवार

बीड स्पीड न्यूज 


घरकुलाची प्रलंबीत कामे १३ जून पर्यंत पूर्ण करा - सीईओ अजित पवार

बीड| प्रतिनिधी-: बीड पंचायत समिती अंतर्गत घरकुलाची प्रलंबीत कामे आहेत. ते 13 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिले. सीईओ अजित पवार यांनी मंगळवारी बीड पंचायत समिती कार्यालया आढावा बैठक घेतली. या बैठकीला गटविकास अधिकऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समिती कार्यालयाच्या अंतर्गत काही घरकुलाची कामे प्रलंबीत राहिलेली आहे. यासह अन्य विषयाच्या संदर्भात काल जि.प.चे सीईओ अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये पवार यांनी 13 जूनपर्यंत सर्व घरकुल पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जलजीवन आणि रोहयो योजनेअंतर्गत कामांना गती देण्याचे निर्देशही पवार यांनी दिले आहेत. या बैठकीला गटविकास अधिकारी सानप, विस्तार अधिकारी कदम, अमोल चव्हाण, चांगण यांच्यासह आदि अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा