Subscribe Us

header ads

युवकांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीयास ग्रामस्थांनी ट्रॅक्टर अडवून दिला चोप!

बीड स्पीड न्यूज 


युवकांवर गोळीबार करून पळून जाणाऱ्या परप्रांतीयास ग्रामस्थांनी ट्रॅक्टर अडवून दिला चोप!

माजलगाव| प्रतिनिधी-: तालुक्यातील तालखेड येथे परराज्यातून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. यात एक जण जखमी झाला असून गोळीबार करणाऱ्यास गावकऱ्यांनी कपडे काढून बेदम चोप दिला. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.तालखेड या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचे काम थांबल्याने काही युवक आनंदाने नाचत होते. तेवढ्यात परराज्यातील तीन ते चार जण असलेली एक जीप तिथे थांबली. त्यातील एक व्यक्तीने अचानक खाली उतरून रस्त्यावर नाचणाऱ्या युवकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने युवकांवर गोळीबार केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला.दरम्यान, ही घटना गावात कळताच गावातील युवक तिथे जमले. त्यांनी रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून जीप अडवली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस गाडी खेचत जमावाने त्याचे कपडे काढून बेदम चोप दिला. दरम्यान, जीप मधील अन्य जण पळून गेले. गोळीबारात साहेबराव जाधव (वय 35 वर्षी ) हे गंभीर जखमी झाले याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा