Subscribe Us

header ads

गॅस सिलेंडरच्या टेंपोखाली चिरडून चिमुकली ठार

बीड स्पीड न्यूज 


गॅस सिलेंडरच्या टेंपोखाली चिरडून चिमुकली ठार


माजलगाव| प्रतिनिधी-: गॅस सिलेंडरच्या टेंपोखाली चिरडून दिड वर्षी चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे घडली.राजवी शिवाजी आळणे (वय दिड वर्ष) असे त्या मृत बालिकेचे नाव आहे. माजलगाव येथील योगायोग गॅस एजन्सीचा घरपोच सिलेंडर पोहोंच करणारा टेम्पो सोमवारी दुपारी पुरुषोत्तम पुरी येथे आला होता. टेम्पोतून सिलेंडर खाली उतरवल्यानंतर चालक टेम्पो पाठीमागे घेत होता. नेमके याचेली किराणा दुकानाकडे निघालेली राजवी टेम्पोच्या पाठीमागे आली होती. चालकाने तिला पहिले नाही आणि त्याचे टेम्पो तसाच मागे घेतल्याने चाकाखाली येऊन राजवीचा मृत्यू झाला. या घटनेने पुरुषोत्तम पुरीवर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा