Subscribe Us

header ads

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सुशोभीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांचे निर्देश

बीड स्पीड न्यूज 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सुशोभीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांचे निर्देश

आ.संदीपभैय्यांच्या पाठपुराव्याने लवकरच होणार कामाची सुरुवात

बीड (प्रतिनिधी):- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुळ्याची उंची वाढवणे व येथील परिसर सुशोभित करण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांचा गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता.या कामासंदर्भात अनेक वेळा बैठका झाल्या आहेत.यातून 

आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नियोजनाखाली सोमवार (दि.३०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत याविषयी बैठक झाली.या बैठकीमध्ये या कामासंदर्भात संबंधितांंना तात्काळ पुढील पाउले उचलण्यास पालकमंत्री ना.धनंजय 

मुंडे यांनी निर्देशीत केले व या कामासाठी लागेल तेवढा निधी आपल्या विभागांतर्गत देण्यात येईल असे सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून येथील परिसर सुशोभित करण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून 

प्रयत्नशील असून याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत.यातून मागील काही दिवसांत वारंवार बैठका घेऊन याबाबत कार्यवाही केली होती.हा प्रश्न आपल्या अस्मितेचा आहे अशी भूमिका कायम आ.संदीपभैय्या यांची आहे.हे काम तात्काळ पार पडण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे विनंती व पाठपुरावा केला यातून जिल्हाधिकारी 

कार्यालय,बीड येथे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीमध्ये या कामासाठी तात्काळ कन्सल्टंट नेमणे व पुढील कार्यवाही करणेसाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले.यासोबतच या कामासाठी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देईल   अशी ग्वाही दिली व आवश्यक त्या बाबींसंदर्भात सुचना दिल्या.या बैठकीस आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपजिल्हाधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक नामदेव टिळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, नगरपरिषदचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे व नगरपरिषदेचे सर्व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा