Subscribe Us

header ads

आरोपींच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला!

बीड स्पीड न्यूज 


आरोपींच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला!


आष्टी| प्रतिनिधी-: तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी वस्तीवरील गेलेल्या दोन पोलिसांवर जमावाने हल्ला केला. ही घटना आज गुरुवारी (दि. १९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पारोडी येथे घडली. जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दंगल नियंत्रक पथकास पाचारण करण्यात आले. याप्रकरणात पाच हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलिस कर्मचारी पारोडी येथे गेले होते. जीपमध्ये तीन पोलीस कर्मचारी थांबले तर यातील पोलीस नाईक प्रल्हाद देवडे व पोलिस कॉन्सटेबल शिवदास केदार हे दोघे पारधी वस्तीवर गेले. पोलीस दिसताच वस्तीवरील जमावाने अचानक त्यांच्यावर दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर खुटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहा. पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, दंगल नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी तळ ठोकून आहेत.वस्तीवर पोलिसांचा फौजफाटा पाहून काही जण फरार झाले. हल्ला प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा