Subscribe Us

header ads

यात्रेत रथाखाली चिरडून मुलाच्या मृत्यू प्रकरणी; पिंपळनेर पोलिसांत मंदिराच्या विश्वस्तांवर गुन्हा नोंद

बीड स्पीड न्यूज 
 
प्रतिनिधी नवनाथ गोरे

यात्रेत रथाखाली चिरडून मुलाच्या मृत्यू प्रकरणी; पिंपळनेर पोलिसांत मंदिराच्या विश्वस्तांवर गुन्हा नोंद


वाकनाथपुर| प्रतिनिधी-:यात्रेत रेवड्या जमा करताना रथाच्या चाकाखाली येऊन 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील जरुडमध्ये 24 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी मंगळवारी पिंपळनेर पोलिसांत मंदिराच्या विश्वस्तांवर गुन्हा नोंद करण्यात आला.बीड तालुक्यातील जरुड येथे भैरवनाथाचे मंदिर आहे. 24 एप्रिल रोजी इथे यात्रा भरली होती. कोरोनाच्या दोन वर्षात यात्रा न भरल्याने यंदा यात्रेसाठी मोठी झाली होती. यात्रेत भैरवनाथाचा रथ ओढला जात असतो या वेळी रेवड्यांची उधळण भाविकांकडून केली जाते. या रेवड्या गोळा करत असताना जरुड येथीलच परमेश्वर नागेश बर्डे (वय 15 वर्षीय) या युवकाचा रथाच्या चाकाखाली चेंगरुन मृत्यू झाला होता. दरम्यान, मंदिराच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने यात्रा काळात सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत मृत परमेश्वरचे वडिल नागेश बर्डे यांनी मंगळवारी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन बाळासाहेब बळीराम काकडे, कांता बाबुराव काकडे, संजय बळीराम काकडे यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा