Subscribe Us

header ads

चोरट्याने दुचाकीवरुन शिक्षिकेची दागिन्यांची पर्स लांबवली

बीड स्पीड न्यूज 


चोरट्याने दुचाकीवरुन शिक्षिकेची दागिन्यांची पर्स लांबवली


बीड|प्रतिनिधी-:शहरातील नगर रोडवर दुचाकीवरुन जातांना बहिनीची वाट पहात थांबलेल्या एका शिक्षिकेने दुचाकीच्या हॅन्डलवर लटकवलेली दागिन्यांची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.सविता गणपतराव परझने (रा. तुळजाईनगर, बीड) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. त्या शिक्षिका म्हणून बीड येथे कार्यरत आहेत. 3 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्या भावाच्या घरातून तुळजाईनगर येथील त्यांच्या घराकडे स्कूटीवरुन निघाल्या होत्या. वाटेत नगर रोडवर एका शाळेच्या जवळ त्या त्यांच्या बहिनीची वाट पहात थांबलेल्या असतांना तिथे आलेल्या एका चोरट्याने सविता परझणे यांनी दुचाकीच्या हॅन्डलला लटकवलेली दागिन्यांची पर्स हातोहात हिसकावून घेत पलायन केले. या पर्समध्ये 40 हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या, 38 हजार रुपये किंमतीची एक  अंगठी, 9 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आधार कार्ड व इतर कागदपत्रे असा 87 हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकारानंतर परझणे यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली. अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा