Subscribe Us

header ads

शिरीषभाऊ देशमुख व कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांनी भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच दर्शन घेतले!!

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा /प्रतिनिधी: प्रकाश  कारलेकर 

शिरीषभाऊ देशमुख व कैलास भाऊ देशमुख गोरठेकर यांनी भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांच दर्शन घेतले!!
 


उमरी; श्री.अनंत महाराज बेलगावकर यांच्या "भागवत कथा" समाप्ती निमीत्ताने उपस्थित उमरी पंचायत समितीचे उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर व कैलास भाऊ देशमुख यांनी बेलगावकर महाराज यांचे दर्शन घेतले आहेत.भगवंताच्या कथेन मन आणि चित्त रमते, भागवताचा धर्म हा भक्ती रूप धर्म आहे  भगवंताचे मंगलमय चरित्र अंतःकरणातील दोष मनाला पवित्र करणारी भागवत कथा आहे. सनातन वैदिक धर्म धर्म वेद आहे भागवत हा कल्पतरू असल्याने जन्म-मरणातील पापांचा नाश करणारी भागवत कथा असून मनाला शुद्ध करणारे एक साधन आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांनी उमरी येथे केले आहे.सद्गुरू सदानंद बाबा महाराज संजीवन समाधी स्थळ परिसरात विठ्ठल मुक्कावार परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते. श्री अनंत महाराज बेलगावकर यांच्या "भागवत कथा" समाप्ती निमित्ताने उपस्थित राहुन महाप्रसाद घेताना उपसभापती शिरीषभाऊ गोरठेकर, संचालक तथा युवा नेते कैलासभाऊ गोरठेकर उपस्थित होते. यावेळी सोबत माजी नगरध्यक्ष प्रवीण सारडा, नगरसेवक प्रतिनिधी अशोक मामीडवार, पत्रकार नरेंद्र येरावार, आरविंद महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक भागवत भक्त प्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा