Subscribe Us

header ads

शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बोळसा येथे शेतकरी ऊस विकास कार्यक्रम संपन्न

बीड स्पीड न्यूज 


नांदेड तालुका प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बोळसा  येथे  शेतकरी ऊस विकास कार्यक्रम संपन्न 




उमरी :-बोळसा येथे शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी ऊस विकास कार्यक्रम  घेण्यात आला यावेळी कवळे गुरुजी यांनी ऊस लागवड संदर्भात सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि जमिनीचा कर्ब कसा वाढवायचा याबद्दल माहिती दिली ते म्हणाले ऊस तोडणी झाल्यानंतर पाचोळा जाळू नये त्याची कुट्टी करावी यामुळे जमिनीचा कर्ब वाढतो,त्याच बरोबर उसाचे अंतर 5×2.5 असावे म्हणजे ऊस लवकर भरतो आणि त्याचे वजन वाढते,पुढे ते म्हणाले मी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतला मी नागरणी केली,पेरणी केली,दुंडे धरले सोयाबीन कापलो,उसाला पाणी दिलं म्हणून मला शेतकऱ्यांचं दुःख माहीत आहे...
आपल्या परिसरातील शेतकरी समृध्द व्हावा,विकसित व्हावा म्हणून दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी तिसरा कारखाना उभारत आहे.यामुळे  विकासाची गंगा प्रत्येकाच्या घरात वाहेल,ऊस हे नगदी पैसे देणार पीक आहे,नैसर्गिक आपत्ती आली तरी ऊस या पिकास काहीही होत नाही म्हणून प्रतेक शेतकर्यांने ऊस लागवड करावी आणि काही लागवड संदर्भात काही माहिती हवी असल्यास ऊस विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा मला बोला आम्ही सदैव आपल्या साठी तत्पर राहून असे ते म्हणाले....शेती बरोबर जोड धंदा दुगधव्यवसाय आहे शेतकऱ्यांनी गाय,म्हैस सुधा ठेवावी आपल्या दुधाला डेअरी च्या माध्यमातून जास्तीचा भाव देण्याचा प्रयत्न करू,दुधाचे पैसे है खेळेते भांडवल म्हणून आपल्याला मदत होईल असेही ते म्हणाले...कारखाना आणि शेतकरी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत या दोघात समतोल असणे महत्वाचे आहे असेही ते म्हणाले...ऊस विकास अधिकारी साई सावंत यांनी शेतकरयांना विविध फवारणी बदल,सेंद्रिय खत बद्दल माहिती दिली,ऊस लागवड झाल्यानंतर मला संपर्क करा मी स्वतः आपल्या शेतात येऊन जास्त उत्पणांबद्दल माहिती देईन असेही ते म्हणाले..यावेळी सरपंच नानाराव पाटील शिंदे,माजी सरपंच मधुकर पाटील शिंदे,चेअरमन बाबुराव पाटील बोळसेकर,आनंदराव पाटील भायेगाव कर,माधव पाटील बोळसेकर,मारोतराव पाटील शिंदे,तुकाराम पाटील शिंदे,गोविंद पाटील शिंदे,बालाजी पाटील शिंदे,केशव पाटील शिंदे,बाबुराव पाटील शिंदे,केशव पाटील शिंदे,आनंद पाटील शिंदे,बालाजी पाटील शिंदे,राजेश पाटील शिंदे,यांच्यासह गावातील बहुसंख्य शेतकरी  आदी जन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा