Subscribe Us

header ads

आनंदगाव शिवारातील खून प्रकरणाचा उलगडा; खुनाचे सत्र सुरु ठेवण्याचा इशारा देणारा किलर अटक

बीड स्पीड न्यूज 


आनंदगाव शिवारातील खून प्रकरणाचा उलगडा; खुनाचे सत्र सुरु ठेवण्याचा इशारा देणारा किलर अटक

बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील आनंदगांव शिवारात रात्री आपल्या शेताची राखण करण्यासाठी गेलेल्या कुंडलीक सुखदेव विघ्ने या 65 वर्षीय शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी आरोपीने याच शिवारातील खांबा लिंबा गावच्या नारायण सोनवणे हे आपल्या घरासमोर झोपले असताना त्यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी झालेल्या आणि खून केलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहाजवळ खून करणाऱ्या आरोपींना वेगवेगळ्या लोकांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्यामध्ये माझ्या बायकोचा खून झाला असून जोपर्यंत माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत खुनाचं सत्र सुरूच राहील असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं होते त्यामुळे या आरोपीच्या शोधात बीड पोलिसांची वेगवेगळी पथक रवाना झाली.पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीनं वेगवेगळ्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. मात्र पोलिसांनी जलद गतीने तांत्रिक तपास केला असता मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठी आणि जखमी शेतकऱ्याच्या घरासमोर गेलेली चिठ्ठी या दोन्ही चिठ्ठ्या एकाच आरोपीने लिहिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांना तपास चालू असतानाच गुप्त खबऱ्याकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली.आनंदगाव येथे ज्या शेतकऱ्याचा खून झाला तो खून शिरूर तालुक्यातल्या ताकडगाव येथील भगवान पुस्तक्या चव्हाण याने केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भागवानचा शोध सुरू केला पोलीस त्याच्या मागावर असताना तो पैठण तालुक्यातील बिडकीन या गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली असता तो तेथूनही वर्धा जिल्ह्यातल्या पूजाई गावात गेल्याची भनक पोलिसांना लागली आणि पोलिसांनी थेट वर्धा जिल्ह्यातलं पुजाई गाठलं. पोलीस आपल्या मागावर असल्याच कळतात आरोपी भगवान चव्हाणने पळ काढला मात्र पोलिसांनी देखील दीड किलोमीटर पाठलाग करून त्याच्या मुसक्याआवळल्या. आरोपी भगवान चव्हाण यांने दोन्ही गुन्हे आपणच केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.खून करून मृतदेहाजवळ चिठ्ठ्या ठेऊन आरोपीने पोलिसांना आव्हान दिल्याचा प्रकार पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात घडला, पोलिस यंत्रणेसमोर आरोपीला पकडण्यासाठी मोठ आव्हान उभं होतं. मात्र बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जो गुप्त तपास करून आरोपीला जेरबंद केला. त्यामुळे बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा