Subscribe Us

header ads

अंगणवाडी मदतनीस यांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरु...आर्जून सुतार यांचा सत्कार

बीड स्पीड न्यूज 


अंगणवाडी मदतनीस यांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरु...आर्जून सुतार यांचा सत्कार

बीड/प्रतिनिधी-: अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस च्या ८२ जागा रिक्त होत्या कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीच शासकिय जागेची भरती करण्यात नव्हती. रिक्त असणार्‍या जागेची भरती करण्यात यावी याची मागणी महिला व बालकल्याण राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवराई तालुका अध्यक्ष आर्जून सुतार यांनी करुन त्याचा पाठपुरावा केला. आणि अखेर आर्जून सुतारा यांच्या पाठपुराव्याला यश आले,महिला व बालकल्याण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांनी हिरवा कंदील दाखवल्याने या रिक्त जागेची भरती प्रक्रियेला मान्यता मिळाली.भरती प्रक्रियेला मान्यता मिळवण्यासाठी आर्जून सुतार यांनी पाठपुरावा केल्यामुळे त्यांचा गेवराई पंचायत समिती येथे बहुजन जागृती अभियान चे संस्थापक सचिव शिवाजीराव डोंगरे, लक्ष्मण हजारे, कैलास बनसोडे, शामा ईगवे, मच्छिंद्र गायकवाड, नाथा गायकवाड, भास्कर धुरंधरे, किरण सुतार ईत्यादी यांनी उपस्थीत राहून पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.अंगणवाडी मदतनीस यांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरु करुन दिल्याबद्दल मा. आर्जून सुतार यांच्यावर विविध पक्षातील,संघटणेतील तसेच सामाजीक कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका यांच्याकडून सत्कार करण्यात केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा