Subscribe Us

header ads

बीड नगर पालिकेतील माजी कर अधिक्षक सय्यद इद्रीस यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


बीड नगर पालिकेतील माजी कर अधिक्षक सय्यद इद्रीस यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी) :- नगर पालिकेत कर अधिक्षक म्हणून सेवा बजावलेले निवृत्त अधिकारी सय्यद इद्रिस सय्यद शिबली यांचे आज सकाळी औरंगाबाद येथील रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. बीड शहरातील शाहुनगर भागात राहणारे सय्यद इद्रिस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी आज रात्री 8:30 वा. ( इशाच्या नमाजनंतर) बालेपीर दर्गा मस्जीद कब्रस्तान येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सय्यद कुटुंबियांच्या दुःखात बीड स्पीड परिवार सहभागी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा