Subscribe Us

header ads

राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेल्या लिपिकांची बदली

बीड स्पीड न्यूज 

राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेल्या लिपिकांची बदली

इंजि. सादेक इनामदार यांच्या तक्रारीची उत्पादन शुल्कच्या आयुक्तांकडून दखल

बीड| प्रतिनिधी-: दि.२७ : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात दोन लिपिक वर्षानुवर्षे ठाण मांडून होते. त्यांची करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि.सादेक इनामदार यांनी उत्पादन शुल्कचे राज्य आयुक्त यांच्याकडे दि.१० मार्च रोजी निवेदनाद्वारे केली होती. अखेर दोन्ही लिपिकांची दि.२६ मे रोजी बदली करण्यात आली.वरिष्ठ लिपिक बी.एल. गाडे, राजेश्वरी तिडके असे बदली झालेल्या लिपिकांची नावे आहेत. हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कार्यालयात होते. शासन नियमानुसार ५ वर्षात एकाच कार्यालयात काम केल्यानंतर इतर ठिकाणी बदली होणे अपेक्षित होते. परंतु, दोघेही ७ वर्षांपासून याच कार्यालयात कार्यरत होते. बीड येथे रूजू झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत एफएल ३, एफएल २, सीएल ३ अशी नवीन लायसन्स काढणे, परवाना नुतनीकरण करणे व इतर जे आवश्यक असणारी राज्य उत्पादन विभागाची कामे आहेत, त्यासाठी परवानाधारकांकडून पैसे घेतात. काही परवानाधारकांचे जाणीवपूर्वक प्रकरणे निकाली काढत नाहीत. तसेच जिल्ह्यातील परवानाधारकांकडून पैशाची मागणी करतात. अशा माध्यमातून अवैध संपत्ती गोळा केलेली आहे. त्यांना नौकरी लागण्यापूर्वी किती संपत्ती होती व नौकरी लागल्यानंतर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याची सखोल चौकशी एक समिती नियुक्त करावी. अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि. सादेक बाबामियाँ इनामदार यांनी दिला होता. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ लिपिक बी.एल. गाडे यांची अमरावतीच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात तर राजेश्वरी तिडके यांची कार्यालयीन  लिपिक म्हणून हिंगोली येथे बदली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा