Subscribe Us

header ads

उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब जनतेची लूट उमरी

बीड स्पीड न्यूज 

उमरी ता. प्र प्रकाश  कारलेकर

उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब जनतेची लूट उमरी


उमरी प्रतिनिधी-:उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णाकडून मलम पट्टी च्या नावाखाली सर्रास लूट होत असून या  प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.उमरी तालुक्यासह धर्माबाद व नायगाव तालुक्यातील बऱ्याच गावातील रुग्ण उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात हे रुग्णालय गोरगरीब जनतेच्या कामधेनु रुग्णालय ठरले आहे. या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मलम पट्टी च्या नावाखाली पन्नास ते शंभर रुपये तर टाके मारण्यासाठी दोनशे रुपये घेण्याचा प्रकार सर्रास चालू असून या प्रकाराची दखल वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे. शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी करोडो रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालय डॉक्टर सहकर्मचारी यांना भरमसाठ पगारी व गरीब रुग्णांसाठी औषधी पुरवठा करतात खरोखरच याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो काय? हा विषय वरिष्ठांनी विचाराधीन घेण्यासारखा आहे शासनाने गरीब रुग्णांसाठी रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन मोफत उपचाराची सोय करून दिली आहे पण या ठिकाणी शासनाच्या विरोधात येथील कर्मचारी दररोज गरीब रुग्णांना पैसे घेतल्या सेवा मलम पट्टी व टाके मारीत नाही अशा प्रकाराला येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचे वचक नसल्याचे बोलल्या जात असून ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी प्रकार थांबवावा अशी मागणी विविध पक्षाचे, संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा