Subscribe Us

header ads

अर्णव जगदीश पडुळे ने मिळवला सर्वोत्कृष्टअबॅकस मास्टर सुवर्णपदक

बीड स्पीड न्यूज 


अर्णव जगदीश पडुळे ने मिळवला सर्वोत्कृष्टअबॅकस मास्टर सुवर्णपदक

बीड प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शालेय तंत्रांचा वापर केला जातो त्या मधील अतिशय महत्त्वाचं एक गणितीय तंत्र म्हणजेच अबॅकस असून साधारणतः ज्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरीता एक अतिशय महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. शहरातील अबॅकस स्टडी सेंटर द्वारे अनेक विविध अबॅकस स्पर्धा घडवून आणून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो त्यामधील एका अबॅकस लेव्हल मध्ये अतिशय हुशार आणि चाणाक्ष विद्यार्थी अर्णव जगदीश पडुळेने अबॅकस लेव्हलच्या परीक्षेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून सुवर्ण पदक मिळवलेले आहे. दिनांक 28 एप्रिल 2022 मध्ये अर्णव पडुळेने अबॅकस परीक्षेमध्ये अवघ्या फक्त दहा मिनिटांमध्ये 60 प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर दिलेली असून यामध्ये 97% मार्क्स मिळवले आहेत आणि प्रथम क्रमांक मिळवला आहे, म्हणून जुलै 2022 मध्ये एकूण 54 देशांच्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिपसाठी अर्णव पडुळेची निवड करण्यात आलेली आहे. अर्णव पडुळेच्या ऐतिहासिक यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा ही अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. सतत अभ्यास करून घेणे दिलेले होमवर्क पूर्ण केल्यामुळे यश मिळालेले आहे. अर्णव पडुळेने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून स्वागत , अभिनंदन, पुढील आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत होत , असे जिल्हा अबॅकस वितरक एस ए घोडके यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा