Subscribe Us

header ads

चंपावतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात1987 चे वर्गमित्र आले एकत्र, जुन्या आठवणींना उजाळा देताना गुरूजनांप्रती व्यक्त केली सद्भावना

🇧​🇪​🇪​🇩​ 🇸​🇵​🇪​🇪​🇩​ 🇳​🇪​🇼​🇸​


चंपावतीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
1987 चे वर्गमित्र आले एकत्र, जुन्या आठवणींना उजाळा देताना गुरूजनांप्रती व्यक्त केली सद्भावना



बीड (प्रतिनिधी)- एसएससी परीक्षा मार्च 1987 च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवार दि.4 जून 2022 रोजी उत्साहात सपन्न झाला. सकाळी ठीक 10 वा.सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे राहिले. इयत्ता 10 वी असतांना 1987 साली ज्या प्रांगणात राष्ट्रगीत होत असे त्याच प्रांगणात उभे राहून राष्ट्रगीत गाताना सर्व विद्यार्थी देहभान हरपून  गेले होते.त्यानंतर 1987 साली शाळेत ज्ञानदान करणारे जे 

गुरूवर्य आज हयात नाहीत त्यांना तसेच हयात नसणार्‍या वर्गमित्रांना दोन मिनीटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शालेय शिस्तीचे पालन करून सर्व विद्यार्थी रांगेत आपापल्या वर्गात स्थानापन्न झाले.यानंतर संस्थेचे सचिव जगदीशभाऊ काळे, जि.प.बीडचे माध्य.शिक्षणाधिकारी सारूक साहेब, शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका श्रीम.कुलकर्णी मॅडम व सर्व माजी शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात 

आले.यानंतर शाळेची यशस्वी परंपरा पुढे कायम ठेवणार्‍या शाळेतील विद्यमान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्‍या शाळेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका श्रीम.नयना कुलकर्णी मॅडमचा सत्कार माजी विद्यार्थीनींच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री.जगदीशभाऊ काळे व माध्य.शिक्षणाधिकारी सारूक साहेब यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना गेट-

टुगेदरचे महत्व विषय केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कुलकर्णी मॅडम यांनी शाळेची होत असलेली प्रगती व त्यात माजी विद्यार्थ्यांचे योगदान या विषयी विविध दाखले देऊन सर्वांना खिळवून ठेवले.माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला कपाट भेट देण्यात आले. या बॅचचाच एक विद्यार्थी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार केक कापून करण्यात आला. यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपाहार देण्यात येऊन पुढील कार्यक्रमासाठी अमृत मंगल कार्यालयात सर्व माजी विद्यार्थी माजी गुरूजन वर्ग व शाळेचे विद्यमान शिक्षक यांना आमंत्रित करण्यात आले. अमृत मंगल कार्यालयात उपस्थित सर्व गुरूवर्यांच्या 

हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवर गुरूवर्यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मरणचिन्ह व भेटवस्तू देवून करण्यात आला.या प्रसंगी माजी शिक्षक श्री.कौंडण्य सर, श्री.खडके सर, श्री.बालासाहेब देशमुख सर, श्री.आचार्य सर, श्री.गोरकर सर, श्री.लाड सर, श्री.पवार सर, श्रीम.नलिनीताई गोडसे मॅडम व चंपावती शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका श्रीम.कुलकर्णी मॅडम उपस्थित होते. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला व मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करून उत्तम आरोग्यासह दिर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.माजी शिक्षक आदरणीय श्री.गोरकर सर, श्री.आचार्य सर, श्री.कौंडण्य सर व श्री.खडके सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना तुमची मैत्री अशीच कायम ठेवा, मैत्रीचे नाते टिकवून ठेवा व सतत काहीना काही निमित्ताने एकमेकांना भेटून सर्वांच्या सुख दुःखात सहभागी व्हा असे सांगून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.यानंतरच्या सत्रात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात बर्‍याच विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य, विनोद इत्यादी कलेचे सादरकरण करून उपस्थितांना खिळवून ठेवले. शेवटचय सत्रात विविध खेळ घेण्यात आले. यात प्रामुख्याने शालेय जीवनात खेळले जाणारे खेळ जसे की संगीत खुर्ची, लिंबू चमचा, लगोरी इत्यादी हे खेळ खेळत असतांना सर्वजण आपले वय विसरून बालपणात गेल्याचा प्रत्यय सर्वांनाच आला. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून माजी विद्यार्थी उपस्थित राहिले. माधुरी मनसबदार ही विद्यार्थीनी यूएसए हून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता निळकंठ यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय सुभेदार यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर निरोप घेतांना सर्व विद्यार्थी भाऊक झाल्याचे दिसून आले. परत लवकरच भेटू अशी भावना व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा