Subscribe Us

header ads

समाज कल्याणमधील अनागोंदी कारभार भोवला; प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी निलंबित

🇧​🇪​🇪​🇩​ 🇸​🇵​🇪​🇪​🇩​ 🇳​🇪​🇼​🇸​


समाज कल्याणमधील अनागोंदी कारभार भोवला; प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी निलंबित

बीड| प्रतिनिधी-: बीड जिल्ह्यात समाजकल्याणमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वारंवार समोर आलेले आहे.जिल्ह्यात अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनियमितता करणे बीडचे समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती उपयोजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक आयुक्तांनी औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते.या चौकशीत डॉ. सचिन मडावी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागाचे अवर सचिव डी. आर. डिंगळे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान यामुळं प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा