Subscribe Us

header ads

ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काळम पाटलाची बदली रद्द; १५ वर्षाहून अधिक काळ गेवराईत चिटकून; सीईओ अजित पवारांवर कुणाचा राजकीय दबाव ?

🇧​🇪​🇪​🇩​ 🇸​🇵​🇪​🇪​🇩​ 🇳​🇪​🇼​🇸​


ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काळम पाटलाची बदली रद्द; १५ वर्षाहून अधिक काळ गेवराईत चिटकून सीईओ अजित पवारांवर कुणाचा राजकीय दबाव ? 



बीड| प्रतिनिधी -: दि. १० : ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील यांची गेवराई येथून माजलगावला झालेली बदली बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आज एका लेखी आदेशाने रद्द केली आहे. विशेष म्हणजे काळम पाटील किमान १५ वर्षाहून अधिक काळापासून ते गेवराईत ठाण मांडून बसलेले आहेत. गेवराईत नेमकं असं काय आहे की त्यांना गेवराईच सोडावी वाटत नाही ? गेवराईच्या राजकारण्यांनाही काळम पाटील काय पोहोचवतात? म्हणजे इतक्या वर्षापासून ते काळम पाटलांचा इतका लाड करीत आहेत ?जिल्हा परिषद बीड येथे दि. १३ मे रोजी समुपदेशनाने जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या होत्या. अनेक वर्षापासून एकाच तालूक्यात ठाण मांडून बसलेल्या जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारदर्शकपणे प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. परंतू गेवराई येथील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील यांची प्रशासकीय बदली माजलगाव तालूक्यात झाली असतांना ते त्या तालुक्यात जाण्यासाठी तयार नव्हते. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणला असल्याचे समजते.या दबावापोटीच संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली रद्द केली असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशात संबंधित विस्तार अधिकान्यास 'निपुण भारत' या केंद्र सरकारच्या प्रकल्पावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्याने बदली रद्द करण्यात येत असल्याचे नमूद आहे. मात्र राष्ट्रीय काम कोठूनही करता येत असून यासाठी गेवराईतच ठाण मांडण्याची आवश्यकता काय असा सवाल इतर कर्मचऱ्यांना पडला आहे. आता पारदर्शक काम करणाऱ्या सीईओंनाही दबावात काम करावे लागणार आहे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर राजकीय दबाव आणून काम करु दिले जात नाही असाच हा प्रकार आहे. यासंदर्भात आता कर्मचारी संघटना काय भूमिका घेतात हे पहावे लगणार आहे.



सीईओ अजित पवार यांच्याच कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह

काळम पाटलांच्या बदली आदेशात 'निपुण भारत' या केंद्र सरकारच्या प्रकल्पावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्याने बदली रद्द करण्यात येत असल्याचे • नमूद आहे. मात्र काळम पाटील खरेच राष्ट्रीय कामात इतकं झोकून देतात की काही पर्सनल कामामुळे त्यांना गेवराई सोडावी वाटत नाही? राष्ट्रीय कामासाठी त्यांनी किमान तालुका तरी सोडायला हवाय. एखादा अधिकारी १५ वर्षाहून अधिक काळ एकाच तालुक्यात कसे काय काम करू शकतो? काळम पाटलासाठी निघालेल्या या आदेशाने सीईओ अजित पवार यांच्याच कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा