Subscribe Us

header ads

संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल गलांडे तर सचिव पदी श्रीराम तांदळे यांची एकमताने निवड.

बीड स्पीड न्यूज 


संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल गलांडे तर सचिव पदी श्रीराम तांदळे यांची एकमताने निवड.

केज (प्रतिनिधी) केज तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघर्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल गलांडे यांची तर सचिव पदी श्रीराम तांदळे उपाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील व सचिन साखरे तर कोषाध्यक्ष तात्या गवळी यांची सर्वानमते निवड करण्यात आली.सर्व सामान्य जनतेच्या अडी अडचणी त्यांना काही त्रास होऊ नये शासकीय यंत्रणेने लोकांची कामे वेळेवर करावेत आणि जनतेला काही त्रास होऊ नये म्हणून केज येथील पत्रकारांनी एकत्र येत जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष पत्रकार संघाची स्थापना शासकीय विश्रागृहावर बैठक घेऊन करण्यात आली. सर्वांन मते अध्यक्ष अनिल गलांडे सचिव श्रीराम तांदळे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन साखरे, कोषाध्यक्ष तात्या गवळी, सह सचिव गणेश सत्वधर, तर सदस्य पदी अर्शद शेख, सनी शेख, वाजेद शेख, अशोक भोसले, अरविंद थोरात यांच्या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन निवड करण्यात आली निवडी बद्दल नवीन पदाधिकाऱ्यांचे  तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा