Subscribe Us

header ads

सर्व पक्षीय नेते एकत्रित आल्याने लिंबागणेश सेवा सोसायटी बिनविरोध; अध्यक्षपदी रविंद्र निर्मळ तर उपाध्यक्षपदी यांची सुंदर वायभट यांची निवड

बीड स्पीड न्यूज 


सर्व पक्षीय नेते एकत्रित  आल्याने लिंबागणेश सेवा सोसायटी बिनविरोध; अध्यक्षपदी रविंद्र निर्मळ तर उपाध्यक्षपदी यांची सुंदर वायभट यांची निवड


बीड | प्रतिनिधी | तालुक्यातील लिंबागणेश सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे रविंद्र रघुनाथ निर्मळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी पिंपरनईचे सुंदर वायभट यांची बिनविरोध निवड  झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे २, भाजपा ३ व शिवसंग्रामचे ३ असे एकुण १३ संचालक बिनविरोध निवडून आले. सेवा सोसायटीची  निवडणूक  मंगळवार ३१ मे  २०२२  रोजी घेण्यात आली.लिंबागणेश सर्कलमध्ये सर्वात मोठी मानली जाणारी एक हजार सभासद संख्या असलेल्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रात लिंबागणेश बेलगाव, पिंपरनई, सोमनाथवाडी, पोखरी, कोळवाडी गावे येतात. आजपर्यंत ही सोसायटी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या, भाजपाच्या ताब्यात होती. यावर्षी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकत्रित येऊन सोसायटी बिनविरोध काढत चेअरमनपदी शिवसेनेचे रविंद्र रघुनाथ निर्मळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी पिंपरनईचे सुंदर धोडींबा वायभट यांची निवड केली तर संचालक म्हणून दिंगाबर शेळके, शिवाजी रणखांब, साहेबराव फरताळे, शहाजी फाळके, नवनाथ मुळे, सुंदरराव जाधव, बिबिशन वाणी, रमेश दाभाडे, खिल्लारे लक्ष्मण तसेच महिला प्रतिनीधी शांताबाई पवार, सोनाली निर्मळ यांची सर्वानुमते निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डावकर यांनी काम पाहिले. सोसायटी बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, माजी पं.स.सदस्य राजाभाऊ गिरे, बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, सरपंच बाळासाहेब वायभट, बाबासाहेब खिल्लारे, बेलगाव सरपंच अश्विनी शेळके, सोमनाथवाडी सरपंच आकाश शेळके, बाळासाहेब मुळे, शालेय समिती अध्यक्ष सुरेश निर्मळ तसेच उपसरपंच शंकर वाणी यांची परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा