बीड स्पीड न्यूज
वाढत्या महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे तहसिल आवारात आंदोलन
सरकार पाडा पाडी नंतर करा आदी गोरगरीब जनतेला जगण्याची सोय करावी - बाळासाहेब गायकवाड
पाटोदा प्रतिनिधी/ दि.23 गँस सिलेंडर, पेट्रोल,डिझेल यांच्या किमती प्रचंड वाढल्या असल्यामुळे गोरगरीब लोकांना अनंत अडचणीचा व महागाईचा फटका बसत असून गोरगरीब कष्टकरी नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून रोजगार नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे आवगड झाले आहे तर पेट्रोल डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने गोरगरीब लोकांना गॅस सिलिंडर घ्यायला पैसे नाहीत जीवन आवश्यक वस्तूच्या किमती खूप वाढल्याने गोरगरीब लोकांना जगणे अवगड झाले असल्याने शासन फक्त झोपेचे सोंग घेत आहेत यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पाटोदा वंचित बहुजन आघाडीने गुरुवार दिनांक 23/06/2022 रोजी पाटोदा तहसीलच्या आवारात महागाईच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करत झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे गोरख झेंड,पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल पवळ, राहुल शिरोळे,सुभाष सोनवणे, यांच्या सह पाटोदा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
0 टिप्पण्या