बीड स्पीड न्यूज
ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूलचा गुणवत्तेवर भर
बीड / प्रतिनिधी-: बहुतांश इंग्रजी शाळांचा भर व्यावसायिकतेवर असतो . अनेक नामवंत इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना ट्यूशन लावावीच लागते त्याशिवाय त्यांची गुणवत्ता वाढत नाही हा अनुभव सर्वच पालकांना आलेला आहे . परंतु ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना बाहेर ट्यूशन लावण्याची गरज पडणार नाही , अशा पद्धतीने शाळेतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली जाणार आहे . स्कूलची स्थापना सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोन ठेवून करण्यात आली आहे . या शाळेत व्यावसायिकतेऐवजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे . असे प्रतिपादन ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक सचिव डॉ . नंदकुमार उघाडे यांनी केले . शहरातील बाळराजे नगर येथे ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूलचे उद्घाटन युवा नेते तथा नगरसेवक डॉ . योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले . उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ . योगेश क्षीरसागर म्हणाले की पालवन चौक परिसरात रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे या परिसरात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या इंग्रजी शाळेची आवश्यकता होती , ब्रिझ प्रि प्रायमरी स्कूल सूरु केल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे असेही डॉ . योगेश क्षीरसागर म्हणाले . यावेळी बोलताना शिक्षक नेते उत्तम पवार म्हणाले की, पुण्यातील दर्जेदार शिक्षणाप्रमाणे बीडमधील विद्यार्थ्यांना ब्रिझ स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. या संधीचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन पवार सर यांनी केले. उद्घाटन समारंभास बांधकाम सभापती विनोद मूळुक, नगरसेवक गणेश वाघमारे , भीमराव वाघचौरे, भैय्यासाहेब मोरे, विकास जोगदंड, रविंद्र बनसोडे आदी नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले हे मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन ज्योती शिनगारे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन शाळेचे समन्वयक सुनील डोंगरे यांनी केले.

0 टिप्पण्या