Subscribe Us

header ads

बीड न. प. च्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक संपन्न

बीड स्पीड न्यूज 

बीड न. प. च्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक संपन्न

बीड|प्रतिनिधी-: बीड शहरातील स्वच्छतेच्या आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी श्री. उमेश ढाकणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी चांगले व नवीन सिमेंट रस्ते जीवन प्राधिकरणकडून खराब करण्यात आले आहेत. खराब झालेल्या रस्त्यांची सिमेंटने डागडुजी करून देण्यात यावी व राहिलेले नळ कनेक्शन लवकर जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. याप्रसंगी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर योजनेचे 

काम पूर्ण करा अशा स्पष्ट शब्दात समज देण्यात आली. नागरिकांचा या कामाबद्दल असणारा रोष कडक शब्दात यावेळी अधिकारी वर्गाला जाणीव करून दिली.तसेच स्वच्छता संदर्भात कामास अजून गती देऊन मोठ्या नाल्यांवर असलेले अतिक्रमण हटवून राहिलेल्या मोठ्या नाल्यांमधील गाळ लवकरात लवकर काढण्यात यावा, यावेळी शहरात सुरू असलेल्या घंटागाड्या संदर्भात माहिती घेत नादुरुस्त घंटागाड्या दुरुस्त करून चालू करणे व घंटा गाड्यांची रोजच्यारोज अहवाल देण्याचे आदेश नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले. यासह इतर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने रस्ते खोदुन ठेवले होते अशा ठिकाणी तात्काळ मुरुम टाकुन कामे पूर्ण करावीत अशा सुचना देखील केल्या.यावेळी नगरसेवक नरसिंग (आण्णा) नाईकवाडे, सादेक जमा, भास्करराव जाधव, फारुक पटेल, गणेश वाघमारे, भीमराव वाघचौरे, राजेंद्र काळे, एकबाल शेख, बाळासाहेब गुंजाळ, रवींद्र कदम, सादेक शेख, विकास जोगदंड, शुभम धुत, अक्रम बागवान आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा