Subscribe Us

header ads

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्वाचा अजेंडा उघड स्वीकारला - रेखा ठाकूर

बीड स्पीड न्यूज 


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्वाचा अजेंडा उघड स्वीकारला - रेखा ठाकूर 

बीड|प्रतिनिधी-: शिवसेनेच्या नामांतराच्या निर्णयाला खुलं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंदुत्वाचा अजेंडा उघडपणे स्वीकारल्याचे जाहीर होत आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी दिली. त्या आज मंत्रिमंडळाने घेतलेल्या नामांतराच्या निर्णयावर बोलत होत्या. शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्याआधारे महाविकास आघाडीचे सरकार चालणार असा देखावा करून किमान समान कार्यक्रमांमध्ये नामांतराचा विषय नसल्याचा खुलासा काँग्रेसकडून करण्यात आला होता. परंतु नुकताच शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला नामांतराचा निर्णय होत असताना विरोध न करता या निर्णयाला मंत्रिमंडळातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुले समर्थन दिले आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणण्यामागे ज्या धर्मनिरपेक्ष मतदारांचे मोठे योगदान आहे त्या सर्व सेक्यूलर मतदारांनी धर्मनिरपेक्षतेचे मूल्य जोपासण्यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या आड फसवणूक करणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांकडून भविष्यात सावध राहण्याची गरज आहे. 

सिद्धार्थ मोकळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
8007009364

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा