Subscribe Us

header ads

मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त पदभाराचा मनमानी कारभार

बीड स्पीड न्यूज 


मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त पदभाराचा मनमानी कारभार

डी.एम.माने कडून सर्वसामान्यांना अरेरावी; वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज



अंबाजोगाई, दि.19 (प्रतिनिधी)ः- शेतकर्‍यांच्या शेतातील माती तसेच  मातीतील विविध घटक तपासून त्यांच्या जमीनीमध्ये कुठल्या प्रकारचे धान्य योग्य पदध्तीने उत्पन्न देवू शकते. हे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत केले जाते. परंतू अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त पदभार संभाळणारे डी.एम.मानेंनी आपला मनमानी कारभार सुरू केला असून आलेल्या शेतकर्‍यांना तसेच सर्वसामान्यांना व कर्मचार्‍यांनाही अरेरावीची भाषा करत उद्धटपणे वागणुक दिली जात असल्याने वरिष्ठांनी वेळेत लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.बीड जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती दुर करण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत विविध कार्यक्रमातून वेगवेळे उपक्रम राबविले जातात. त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या मृदाही व्यवस्थित राहील तर शेती उत्पादन वाढेल यासाठी शेतकर्‍यांच्या शेतातील मृदा तपासून त्याची गुणवत्ता सांगण्याचे काम मृदा विभागाचे आहे. अंबाजोगाई येथील उपविभागीय मृदा व जलसंधारण कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून योग्य काम करत असले तरी तेथील अतिरिक्त पदभार दिलेल्या डि.एम. मानेंना आपण या कार्यालयाचा कारभारीच झालो असल्याचे भासत तेथील कारभारात मनमानी सुरू केली आहे. कार्यालयात आलेल्या सर्वसामान्याना अरेरावी भाषा वापरत कर्मचार्‍यांना उद्धटपणे वागणुक दिली जाते. यामुळे येथील कर्मचारीही त्यांच्या कारभाराला कंटाळले असून त्यांच्या अशा वागणुकीवर आळा आणण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. काही दिवसापुर्वी आलेल्या पदाचा गैरवापर करत सुट्टीच्या दिवशीही कर्मचार्‍यांना कार्यालयात बसवून ठेवणे तसेच कार्यालयातच धुम्रपान करणे यासह आदी बाबी  समोर येत आहे. तरी मृदा व जलसंधारण उपविभागीय कार्यालयाचा डी.एम.मानेकडे देण्यात आलेला अतिरिक्त पदभार काढून स्वच्छ इतर अधिकार्‍यांकडे देण्यात येण्याची मागणी केली जात आहे. तरी या मागणीकडे वरिष्ठांणी वेळेत लक्ष देवून मनमानी कारभार चालविणार्‍या मानेंचा पदभार काढण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.


सुट्टीच्या दिवशी कार्यालयात चालते तरी का?

काही काळापुर्वीच देण्यात आलेला अतिरिक्त पदभार संभाळताना डी.एम.माने कडून मनमानी केली जात असून अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवले जाते. मग नेमके सुट्टीच्या दिवशी या कार्यालयात चालते तरी काय असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा