Subscribe Us

header ads

कटकारस्तान व द्वेष करणाऱ्या भाजपाला सोडून पंकजाताई मुंडे यांनी लोकसेना पक्षात सामिल व्हावे प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


कटकारस्तान व द्वेष करणाऱ्या भाजपाला सोडून पंकजाताई मुंडे यांनी लोकसेना पक्षात सामिल व्हावे प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: राष्ट्रीय नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या निधनानंतर असे वाटत होते की भाजपा पक्ष व नरेंद्र मोदी पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांना न्याय देईल परंतु तसे न होता त्यांच्यावर सतत अन्याय होताना दिसून येत आहे विधानसभा निवडणूकीत पाड़ण्या पासून ते विधानपरिषदेचे तिकिट कापण्या पर्यंत महाराष्ट्रातील काही भाजपा नेते कामाला लागलेले आहे म्हणून पंकजाताई मुंडे यांनी कटकारस्तान व द्वेष करणाऱ्या भाजपाला सोडून आपल्या कार्यकर्तेसह लोकसेना पक्षात सामिल व्हावे असे निमंत्रण लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिले आहे.स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असते तर आतापर्यंत काहीतरी वेगळा निर्णय घेतले असते पण ताई आपण आपली सहनशिलता कुठपर्यंत दाखवणार भाजपा हा एक नंबरचा हरामखोर व निर्लज्ज पक्ष आहे तुम्हाला न्याय देणार नाही कारण तुम्ही ओबीसी व बहुजनवादी नेत्या आहेत आणि राज्यातील काही मनुवादी नेते तुमच्या विरोधात आहे हे अनेक वर्षापासून जनतेला कार्यकर्ते यांना दिसत आहे. लोकसेना पक्षाच्या मंचावरून आपण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्याल योग्य व लोकहितवादी निर्णय घ्याल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे लोकसेनामुळे आपले व आपल्यामुळे लोकसेना पक्षाचा फायदा होईल म्हणून जनता व कार्यकर्ते यांचा विचार करुन आपण लवकरात लवकर निर्णय घेवून भाजपा सारख्या अपयशी पक्षाला सोडचीट्टी दयावी कारण आतापर्यंत नोटबंदी योजना फेल, जीएसटी योजना फेल, एनआरसी योजना फेल, किसान कायदा फेल, अग्निपथ योजना फेल अंतरराष्ट्रीय सम्बन्ध फेल अशा सर्वच ठिकाणी फेल ठरणाऱ्या व बेरोजगारी, महगाई, दंगली कड़े दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा पक्षाला आपण जय महाराष्ट्र करुन लोकसेना पक्षात सामिल व्हावे व प्रवेश करावा अशा प्रकारचे निमंत्रण लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिले आहे.
                                 
                        
                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा