Subscribe Us

header ads

फडतूस सल्ला केंद्राच्या आडून ताईंच्या विरोधात पूर्वनियोजित खटाटोप

बीड स्पीड न्यूज 


फडतूस सल्ला केंद्राच्या आडून ताईंच्या विरोधात पूर्वनियोजित खटाटोप

खा. इम्तियाज जलील यांचा बोलविता धनी कोण ? - सलीम जहाँगीर

पंकजाताई बहुजनमान्य लोकनेत्या ; जलीलभाई यांच्या सल्ल्याची गरज नाही

बीड ( प्रतिनिधी ) लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वारसा समर्थपणे चालविण्यासाठी पंकजाताईसाहेब सक्षम आहेत. एका हाकेवर लाखोंचा जन समुदाय आज त्यांच्यासाठी एकत्र येतो. राज्यातील 55 विधानसभा मतदारसंघात   लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची भूमिका निर्णायक आहे. संघर्षातुन पुढे येत पंकजाताईंनी काढलेला मार्ग आज महामार्ग झाला असून त्यांना खा. इम्तियाज जलील यांच्या फडतूस सल्ल्याची गरज नाही. खा.जलील यांना आत्ताच का मदतीचा पुळका आला ?  पंकजाताई बहूजन लोकनेत्या आहेत. फडतूस सल्ला केंद्राच्या आडून ताईंच्या विरोधात पूर्वनियोजित राजकीय खटाटोप रचला आहे. ताईंनी पक्षातून बाहेर जावे यासाठीच खा.जलील यांनी ही स्टंटबाजी केली असून त्यांच्या बोलविता धनी कोण असा प्रश्न भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी उपस्थित केला आहे.भाजप नेत्या पंकजाताई मुंडे या बहूजन मान्य लोकनेत्या आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा त्या समर्थपणे चालवत आहेत. बहुजन लोकनेत्या म्हणून पंकजाताई यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. त्यांची वाढत आसलेले लोकप्रियता विरोधकांच्या आणि काही स्वकियांच्या डोळ्यात खपत असल्यामुळे  दिग्गज नेत्याचे मित्र खा. इम्तियाज जलील यांना सल्ला केंद्राच्या आडून पुढे केले गेले आहे. जलील यांच्या सल्ल्यामागे काहीतरी पूर्वनियोजित कटकारस्थानचा वास येत असून खा.जलील यांच्या तोंडी हा सल्ला टाकला असला तरी त्यामागे डोके मात्र दुसऱ्याचे आहे.  खा.जलिलभाई तुम्ही आमच्या ताईंची काळजी करू नका. त्यांची काळजी करण्यासाठी राज्यातील बहूजन वर्ग सक्षम असून बहुजनांच्या ताकदीवरच पंकजाताईंचे राजकीय भविष्य उज्वल आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणून ताईसाहेबांचा नक्कीच सन्मान होईल असा विश्वास भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केला. दिवंगत नेते विलासराव देशमुख साहेब यांचा विधानसभेला पराभव झाला मात्र ते  जनतेत गेले,  निवडून आले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पंकजाताई यांच्या एका परभावाने आणि विधान परिषदेची संधी न मिळाल्याने पंकजाताई संपल्या आहेत असे कोणी समजू नये. ताईंच्या रक्तात संघर्ष आहे आणि मनगटात राज्य चालविण्याची ताकद आहे, त्यामुळे त्यांना कोणी सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये. समर्थकांकडून हल्ला , नाराजी असे काही घडवून आणू नये. खा.जलील यांनी आपला सल्ला आपल्याकडेच ठेवावा,भविष्यात या सल्ल्याची गरज तुम्हांलाच पडेल. कोणाच्या तरी सांगण्यावरून एव्हढेही छुप्या मैत्रीला जागु नका असा टोलाही भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी लगावला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा