Subscribe Us

header ads

पाचोडजवळ अपघात बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञासह दोघे गंभीर जखमी

बीड स्पीड न्यूज 

 पाचोडजवळ अपघात बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञासह दोघे गंभीर जखमी

बीड-: येथील जिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ आपल्या चार चाकी वाहनातून औरंगाबादला जात होते. पाचोडजवळ गाडीवर (MH 23 AS 9294) या गाडीचा नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरली.गाडीने 

पलट्या मारल्याने डॉक्टरसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.डॉ. रामेश्वर आवाड असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आवाड हे जिल्हा रूग्णालयात कार्यरत असून आज 

सकाळीच औरंगाबादला आपल्या (MH 23 AS 9294) या चारचाकी वाहनातून जात होते. पाचोडजवळ त्यांच्या स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलटी मारल्याने गाडीचा चुरा झाला होता.याच गाडीत डॉ. आवाड यांचे ओळखपत्रही सापडले आहे.या  घटनेची माहिती मिळताच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे देखील औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा