Subscribe Us

header ads

नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला चौसाळा कडकडीत बंद

बीड स्पीड न्यूज 


नितीन लोढा यांच्यावर प्राणघातक हल्ला चौसाळा कडकडीत बंद 


बीड|प्रतिनिधी-: तालुक्यातील चौसाळा येथील माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे नातू व भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढा (३२) यांच्यावर हल्ला करण्यात आला असून, हल्ला करणारा व्यक्ती हा गावातीलच आहे. सदर हल्ल्यात नितीन लोढा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादेत खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच्या निषेधार्थ ७ जून रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.सदर घटनेतील आरोपी तरुणाचे नाव रणजित गुंजाळ असं आहे. रणजीत गुंजाळ हा चौसाळा गावातीलच रहिवासी असून, त्याने नितीन लोढा यांच्यावर ६ जून रोजी हल्ला केला आहे. रणजीत गुंजाळ याने नितीन लोंढा यांना भेटण्यासाठी अनेक वेळा फोन केला, मात्र नितीन लोढा हे त्यांच्या नात्यातील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री साडेनऊ वाजता लोढा कुटुंबीय घरी परतले. त्यानंतर, गुंजाळ याने रात्री साडेदहा वाजता गावातीलच रणजित गुंजाळ याने नितीन लोढा यांना फोन करुन भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी भेटू असे सांगितल्यावर मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याला भेटण्यासाठी नितीन लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरुन आलेल्या रणजित गुंजाळने सत्तूरने वार केला.गुंजाळ याने लोढा यांच्यावर केलेल्या हल्ल्यात लोढा यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे. त्यानंतर परिसरातील तरुणांनी त्यास पकडून चोप दिला. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय  पाटील व सहकार्याने त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा