Subscribe Us

header ads

मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत डॉ.कमलाकर कांबळेंचा नागरी सत्कार समारंभ : उपस्थित राहण्याचे पप्पू कागदेंचे आवाहन

बीड स्पीड न्यूज 


मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत डॉ.कमलाकर  कांबळेंचा नागरी सत्कार समारंभ : उपस्थित राहण्याचे पप्पू कागदेंचे आवाहन


बीड / प्रतिनिधी-: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यासह आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आदरील सत्कार समारंभ अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे बुधवार (दि.8) रोजी सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. तरी या सत्कार समारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या विद्यार्थी दशेपासून ते आतापर्यंतच्या सर्वांगीण कार्य कर्तृत्वाची दखल घेत, अंबाजोगाई नागरिकांकडून भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या विशेष आणि प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंत्री रामदास आठवले यांची अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनी पत्रकार परिषदेस आणि प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या भव्य सत्कार समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा