Subscribe Us

header ads

बंजारा समाजाच्यावतीने ढेकणमोहा येथे दीडतास चक्काजाम कंठवलीतील तीर्थधाम पाडणार्‍या सिडकोच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा

बीड स्पीड न्यूज 

बंजारा समाजाच्यावतीने ढेकणमोहा येथे दीडतास चक्काजाम कंठवलीतील तीर्थधाम पाडणार्‍या सिडकोच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा


बीड, दि.14 (प्रतिनिधी)ः- कंठवली नवी मुंबई येथील बंजारा तिर्थधाम, सभामंडप, भक्तीनिवासाचे बांधकाम पाडून समाज बांधवांचे मन दुखविण्याचे काम सिडकोच्या अधिकार्‍यांनी केले असून त्या समाज कंठक अधिकार्‍यांवर कठोर करावी करून सदरील बांधकाम पुर्ववत करण्यात यावे या मागणीसाठी बीड परळी महामार्गवरील ढेकणमोहा येथे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्यावतीने एक तास रस्तारोको करत चक्काजाम करण्यात आला होतो.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तीर्थक्षेत्र सुरक्षीत असल्याचा दावा केला जातो. मात्र असे असतांनाही नवी मुंबई येथील कंठवली या ठिकाणी बंजारा समाजाचे अराद्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे तीर्थधाम उभा करण्यात आले होते. परंतू येथील अधिकार्‍यांनी समाजाचे मन दुखविण्याचे काम केले असून कोट्यावधी रूपये खर्च करून उभा करण्यात आलेले तिर्थधाम, सभामंडम, भक्तीनिवास जमीनउदवस्त करण्याचे काम केले आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची नोटीस अभवा पुर्व कल्पना न देता समाजात देड निर्माण करण्याच्या भावनेने या अधिकार्‍यांने कार्य केले असून समाज कंठक असलेल्या या अधिकार्‍यांवर कठोर 
करावाई करून सदरील पाडझाड करण्यात आलेले बांधकाम शासनाच्या तिजोरीतून पुर्ववत करण्यात यावे या मागणीसाठी एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांच्या आक्रमक घोणाबाजीमुळे ढेकणमोहा परिसर दुमदुमून गेले होते. रस्ता रोको आंदोलनात बंजारा महिला युवक व विद्यार्थांचा मोठा सहभाह होता. महसुल विभागच्या अधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव तथा माजी जि.प.सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण, राज्य उपाध्यक्ष तथा मा.पं.स.सदस्य जीवन राठोड, नितीन चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव राठोड, जिल्हा संघटक अमर राठोड, बीड तालुका अध्यक्ष बाळराजे राठोड, राजेभाऊ पावार, युवक जिल्हाउपाध्यक्ष राहुल राठोड, गेवराई तालुका कार्यध्यक्ष पवन जाधव कैलास राठोड, राहुल राठोड, रमेश पवार, विकास राठोड, गोपाल पवार, शरद राठोड, अनिल पवार, संदिप पवार, अशोक राठोड, अमोल पवार यांच्यासह आदी महिला, विद्यार्थ्यी व तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात रास्तारोका आंदोलनाला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा