Subscribe Us

header ads

अंगणवाडी सेविकांचे जि.प.समोर तिव्र निदर्शने महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी

बीड स्पीड न्यूज 


अंगणवाडी सेविकांचे जि.प.समोर तिव्र निदर्शने
महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी

मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अंगणवाडीताईंमध्ये संतापाची लाट


बीड । प्रतिनिधी-: मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण केल्यानंतर बीड सह राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे प्रश्‍न तत्काळ सोडवू असे आश्‍वासन कृति समितीच्या शिष्टमंडळाला महिला व बालविकास मंत्र्यांनी दिले होते. मात्र त्याचा विसर सरकारला पडला असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने बीड जिल्हा परिषद समोर बुधवारी (दि. 15 जून) दुपारी तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.गेल्या कित्येक महिन्यापासून सातत्याने अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे कृति समितीच्यावतीने धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी  महिला व बालविकास मंत्री व प्रधान सचिव, कुंदन मॅडम, महिला व बालविकास विभाग यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. सदर मागण्या मंजुर करण्याचे त्यांनी ठोस आश्वासन दिले होते. परंतु अदयाप मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र 

राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने बीड जिल्हा परिषद समोर तिव्र आंदोलन करण्यात आले. मागण्यांमध्ये खास गणवेश भत्ता अदा केल्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा, ऑफ लाईन मानधन अदा केल्याचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात यावा, अंगणवाडी इमारतीचे थकीत भाडे दयावे. थकीत प्रवास भत्ता व इंधन बील दयावे, सीबीई व मोबाईलचा प्रोत्साहन भत्ता अदा केल्याचा प्रकल्प निहाय आढावा घेण्यात यावा यासह अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ लागु करा. दरम्यानच्या काळात त्यांना पूर्ण वेळ कर्मचारी घोषित करून 21000 रुपये किमान वेतन लागु करा. राज्य शासनाने मानधनात ऑक्टोबर 2017 मध्ये वाढ केली होती. दरम्यान महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, तरी मानधनात भरीव वाढ करा. सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनातील तफावत कमी करावी, अंगणवाडी कर्मचान्यांना एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागू करावी ती त्यांच्या किमान वैयक्तीक गरजा भागाव्यात इतकी म्हणजे शेवटच्या मानधनाच्या निम्मी असावी. गेल्या चार वर्षापासुन सेवासमाप्ती लाभ थकीत आहे. तरी सेवासमाप्ती लामाथी सर्व प्रकरणे ताबडतोब मानधन दरमहा पाच तारखेपर्यंत देण्यात यावे.  दैनंदिन कामकाजासाठी मराठीतील चांगला निर्दोष ऍप प्रत्येक गावात व वस्तीत चांगली कनेक्टिविटी व मानघनाला जोडून डेटा रिचार्जची योग्य रक्कम देण्याची व्यवस्था करावी.  मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा रुपये 500 व 250 प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. किरकोळ खर्चासाठी मिळणारी सादिलची रु 2000 ही रक्कम अपुरी आहे. अंगणवाडीच्या मदतनिस व सेविकांच्या तसेच मुख्य सेविका व प्रकल्प अधिकान्यांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यात व त्यात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरी सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात, शासनाकडुन मिळणारे सर्व साहित्य अंगणवाडयांच्या वेळेत अंगणवाडयांमध्ये पोहोच करावेत यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर बुधवारी दुपारी तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद बीड श्री चंद्रशेखर केकान यांना देण्यात आले. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या मागर्दशनाखाली जिल्हाध्यक्षा कमलताई बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, बीड जिल्हा संघटक सचिन आंधळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या धरणे आंदोलनाला बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, माजलगाव, वडवणी, धारुर, अंबाजोगाई, परळी या तालुक्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनिस आल्या होत्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा