Subscribe Us

header ads

काळ्या बाजारात जाणारा दोन ट्रक गहू तांदूळ पकडला

बीड स्पीड न्यूज 


काळ्या बाजारात जाणारा दोन ट्रक गहू तांदूळ पकडला

बीड|प्रतिनिधी-: काळ्या बाजारात जाणारा दोन ट्रक गहु तांदूळ अॅडशनल एसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला. ही कार्यवाही बुधवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान शहराबाहेर हायवे परभणी टी पॉईंटवर करण्यात आली. याबाबत समजलेली माहिती अशी की, (एम.एच.२६ ७७१७) व (एम. एच. १२ ६७९५) या दोन ट्रकमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ आणि गहू जात होता.दोन ट्रक परभणी टी पॉईंट येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवारी सकाळी सात वाजता या दोन्ही ट्रक पकडून ट्रकची झडती घेतली. यावेळी त्यांना एका ट्रकमध्ये गहू जो आसपास पंधरा ते २० टन दिसून आला. तर दुसऱ्या ट्रकमध्ये राशनचा तांदुळ पंधरा वीस टनच्या आसपास दिसून आला. जप्त केलेल्या ट्रकसह तीस लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती आहे. दरम्यान दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी ट्रक चालक प्रभाकर पिराजी गायकवाड व नवनाथ जीवन अंकुशे यांना ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा