Subscribe Us

header ads

जिल्हा सहजयोग कमिटी समर कॅम्प उत्साहात बालशक्तींनी उत्स्फूर्तपणे नोंदवला सहभाग

बीड स्पीड न्यूज 

जिल्हा सहजयोग कमिटी समर कॅम्प उत्साहात बालशक्तींनी उत्स्फूर्तपणे नोंदवला सहभाग



बीड| प्रतिनिधी-: जिल्हा सहजयोग कमिटीच्या वतीने बालशक्तीसाठी दोन दिवसीय समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालशक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.रविवार (दि.५) रोजी समर कॅम्पमध्ये सहभाग घेतलेल्या बालशक्तींना श्री निर्मलादेवी यांच्या चरणासमोर भेट वस्तू देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.जिल्हा सहजयोग कमिटीच्या वतीने बालशक्ती मोठ्या संख्येने सहजयोगामध्ये सहभागी व्हावेत याकरीता समर कॅम्पचे दि.३ व ४ जुन या दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहरातील बालशक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी बालशक्तींना मीठपाणी क्रिया, ध्यान,कुंडलिनी जागृती, त्याचबरोबर आपल्या शहरातील सात चक्रा संदर्भात सविस्तर माहिती 

देण्यात आली. यावेळी उपस्थित बालशक्तींनी या सर्व प्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला.त्याचबरोबर येणार्‍या आदीशक्ती महापुजेसाठी स्वखुशीने गीत गायन, डान्स या संदर्भात सहभाग नोंदविण्यासाठी सराव सुरू केला. आजची बालशक्ती उद्याचा सहजयोगी या उद्देशाने आजपासून बाल मनावर जे परिणाम होतात तेच भविष्यात त्यांच्या मनावर रूजले जावेत.त्यांच्यावर सध्याच्या परिस्थितीमध्ये होत असलेले संस्कार आयुष्यात प्रत्येक क्षणाला कामी येतील आणि सहजयोगच्या मार्गाने भविष्यात मार्गक्रमण करून कोणत्याी प्रकारच्या अडीअडचणी येणार नाहीत  या हेतूने या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.रविवार दि.५ जुन रोजी समर कॅम्पमध्ये सर्व सहभागी बालशक्तींना माताजींच्या चरणासमोर भेट वस्तू देऊन प्रोत्साहीत करण्यात आले. हा समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी बालशक्ती कमिटी तसेच जिल्हा सहजयोग परिवाराने परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा