Subscribe Us

header ads

पाच हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारीला अटक माजलगाव पंचायत समितीत एसीबीच्या पथकाची कारवाई

बीड स्पीड न्यूज 


पाच हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारीला अटक 
माजलगाव पंचायत समितीत एसीबीच्या पथकाची  कारवाई

माजलगाव|प्रतिनिधी-: माजलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता यादीत समावेश करुन प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयाकडे पाठवण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी करुन पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या माजलगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) रामचंद्र रोटेवाड याला एसीबीच्या पथकाने सोमवारी गजाआड केले. माजलगाव पंचायत समितीत ही कारवाई केली गेली.रामचंद्र रोटेवाड हे माजलगाव पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे ग्रामपंचातय विभाग आहे. माजलगाव तालुक्यातील केसापूरी येथील ग्रामंचायतीत लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला सेवेची दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांचा सेवाज्येष्ठता यादीत समावेश करुन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी राटेवाड याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली गेली होती. सोमवारी माजलगाव पंचायत समितीत एसीबीने सापळा लावला होता. या वेळी तडजोडीअंती पाच हजार रुपये घेण्याचे मान्य करुन रोटेवाड याने पाच हजारांची लाच स्विकारली. पथकाने त्यांना गजाआड केले.एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल धस कर्मचारी भारत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक