Subscribe Us

header ads

धर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार--रेखाताई देवकर

बीड स्पीड न्यूज 


धर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार--रेखाताई देवकर


विषेश प्रतिनिधी.हानमंत चंदनकर;-राजकीय पटलावर स्वार्थी लोकांकडे सातत्याने सतेची खुर्ची राहत असल्याने सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत.स्वातंत्र्य मिळुन 70 वर्ष झाली तरीही साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही ही लाजिरवाणी बाब आहे  परिवर्तनाचा ध्यास आम्ही उराशी बाळगला असून धर्माबाद नगर परिषदेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकित 22 पैकी 22 जागा तृतीयपंथीयांच्या पॅनल कडुन लढविणार असल्याचे नायगाव मतदार संघाचे तृतीयपंथीयाचे प्रमुख रेखा देवकर यांनी धर्माबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्हीं कोणत्याही राजकीय पक्षाचे बांधिल नाही.तसेच आमचा कोणताही  पारिवारिक वारसदार नाही.त्यामुळे आमच्याकडून स्वच्छ व पारदर्शक कारभार होईल यात शंकाच नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची कायमस्वरूपी नसते या पूर्वीही राजकीय पटलावर अनेक ठिकाणी तृतीयपंथीय निवडून आले आहेत. येणाऱ्या नायगाव विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आम्ही आम्ही पूर्वीच जाहीर केले त्यावर ठाम आहोत. त्याची पूर्वबांधणी म्हणून धर्माबाद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकित आमच्यापॅनल कडून 11 वार्डात 22 पैकी 22 जागा लढविणार आहोत. असेही रेखाताई देवकर म्हणाले.शहरातील विविध नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या अनेकजण आमच्या पॅनलकडुन लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे  स्वच्छ प्रतिमेचा व  जनाधार असलेल्या योग्य व्यक्तीला आम्ही उमेदवारी देऊ असे म्हणत धर्माबाद शहर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभे करण्यासाठी प्राथमिक तयारी झाली आहे. राम चव्हाण बाळापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याचेही रेखाताई देवकर यांनी सांगितले आहे.नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे अनेक पक्षाच्या वतीने फिल्डिंग सुरू असतानाच शहरातील सर्व जागा लढविण्यासाठी प्रथमच तृतीयपंथीयांच्या वतीने एल्गार करण्यात आल्यामुळे भविष्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात वेगवेगळ्या चर्चाना सुरुवात झाली आहे.विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेस विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वलय असलेल्या व्यक्ति उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा