Subscribe Us

header ads

साडेचारशे ब्रास वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड स्पीड न्यूज 


साडेचारशे ब्रास वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


बीड|प्रतिनिधी-: आ. लक्ष्मण पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आलेल्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी वाळूघाटामध्ये कंत्राटदाराने केलेला साडेचारशे ब्रासचा वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.वाळूच्या अवैध उपश्यासंदर्भात वाळूसाठा नदीत ढकलण्याची कारवाई जिल्ह्यात नवे तर राज्यात पहिल्यांदाच होत असावी.गेवराई तालुक्यातील गंगावाडी वाळूघाट संदर्भात गंगावाडी येथील ग्रामस्थ आणि आ. लक्ष्मण पवार यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. आ. लक्ष्मण पवार यांनी ग्रामस्थांसह नदीपात्रात उतरुन सदर वाळूठेका जप्त करण्यासाठी आंदोलन केले होते.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळू उपश्यातील खातरजमा करण्यासाठी समिती नेमली होती. या वेळी कंत्राटदाराने नेमून दिलेल्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणाहून साडेचारशे ब्रास वाळू साठे केल्याचे समोर आले होते. आता सदरची वाळू त्या ठिकाणाहून हलविण्याचे शक्य नसल्याचे सांगत ही वाळू पुन्हा नदीपात्रात ढकलण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. गंगावाडीचा वाळू ठेका रद्द करण्यासाठी आ. लक्ष्मण पवार आक्रमक झाले होते. याच पार्श्वभूमीवर वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचे आदेश आल्याने वाळू कंत्राटदारांमध्ये खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्याततरी वाळू साठा पुन्हा नदीत ढकलण्याची कारवाई प्रथमच होत आहे. कदाचित राज्यातीलही ही पहिलीच कारवाई असावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा