बीड स्पीड न्यूज
संभाजीनगर बनले समस्यांचे माहेरघर,साफसफाईसाठी एकही कर्मचारी नाही,ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
ग्रामसेवकांला वेळ मिळेना तर सरंपचाला नागरिकांचे प्रश्न कळेना
किल्ले धारूर /प्रतिनिधी-: धारूर तालूक्यातील गोपाळपूर अंतर्गत संभाजीनगर भागात मागील काही दिवसापासून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. या भागात संभाजीनगर, वडारवाडा येते पण या भागाची साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे नाममात्र एकही कर्मचारी नाही. त्यामुळे भागातील साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. त्यातच तुंबलेल्या नाल्या व ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.धारूर तालुक्यातून गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या संभाजीनगर वडारवाडा या भागात ५ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. भागात , ग्रामीण रूग्णालयात ,शाळा अंगणवाडी, वीज कार्यालय व इतर शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. भागात ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना जाण्यायेण्या साठी रस्ता तर बरोबरचं नाही त्यात दुग्धीचा त्रास नागरिकांसह रूग्णाना करावा लागत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या भागात विविध समस्यांनी ग्रासले आहे. नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे गटारे भरून वाहत आहेत.या गटाराचे पाणी रस्त्यावर येत असून त्याचे डबके साचत आहेत. घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या भरल्यामुळे त्यातून दुर्गंधी सुटत आहे. शिवाय मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. नियमित भागाची साफसफाई होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ वेळकाढूची भूमिका घेतली. परिणामी गावात अस्वच्छता पसरत गेली.
एक सदस्य किंवा सरपंच,ग्रामसेवक नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत.तसेच ग्रामसेकाला वेळ मिळत नाही तर सरंपचाला नागरिकांचे प्रश्न कळत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.त्याच बरोबर साफसफाई साठी एक ही कर्मचारी नाही.
0 टिप्पण्या