बीड स्पीड न्यूज
मोंढा मार्केट मध्ये साचत असलेल्या पाणीचे नियोजन करा
परळी / प्रतिनिधी :- आज परळी येथे वेल्फेअर पार्टी परळी आणि वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परळी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन करण्यात आले आहे. की मोंढा मार्केट मध्ये साचत असलेल्या पाणीची नियोजन करा व इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावर सविस्तर माहिती अशी आहे की वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन करण्यात येतो की कृषी उत्पन्न बाजार समिती ते एक मिनार चौक मार्केट क्षेत्रात पावसाच्या पाणी ठिकाणी साचत असुन नगर परिषदने यावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर या घाण पाणीचे नियोजन करावे जेणेकरुन बाजारपेठेतील व्यापारी व नागरिक कामगार व नागरिक यांच्या त्रास कमी होईल.तसेच शहरातील अल्पसंख्याक व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ठिकाणी नाल्याची कोंडी झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरील येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. म्हणून या भागातील स्वच्छता वर लक्ष केंद्रित करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावीहे निवेदन देण्यात आले.या वेळी वेल्फेअर पार्टी परळी शहर अध्यक्ष एजाज शेख, वंचित बहुजन आघाडी परळी शहर अध्यक्ष गफ्फार शाह खान,एजाज खान,एबराहीम खान,संजीत शेख महेबुब,शेख मियां भाई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या