Subscribe Us

header ads

प्रहार संघटनेच्या बीड येथील बैठकीस जिल्ह्यातील प्रहार सैनीकांनी उपस्थित रहावे ----- रघुनाथ तोंडे

बीड स्पीड न्यूज 



प्रहार संघटनेच्या बीड येथील बैठकीस जिल्ह्यातील प्रहार सैनीकांनी उपस्थित रहावे ----- रघुनाथ तोंडे



किल्ले धारूर प्रतीनीधी-: प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नामदार ओमप्रकाश,( बच्चु) भाऊ कडु यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष बापुराव काणे साहेब राज्य संपर्क प्रमुख महासचीव रामदास खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि 27 जुन रोजी प्रहार संघटनेची विविध विषयांवर महत्वाची बैठक शासकिय विश्राम गृह बीड येथे दुपारी 1 वाजता ठेवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये दिव्यांग 5% निधी वाटप अंत्योदय योजना घरकुल दिव्यांग प्रमाणपत्र युडिआयडी कार्ड बस पास विषयी काही गैरसमज आहेत. आणि शासनाने संजय गांधी योजनेसाठी उत्पन्न वगैरे जाचक अटी ठेवल्या आहेत. त्याबद्दल जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. दिव्यांगचे आखंड हिंदुस्थानचे हदय सम्राट आदरणीय ओमप्रकाश,( बच्चु) भाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजन आदि विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील प्रहार सैनीक सर्व दिव्यांग बांधव बच्चुभाऊ यांच्यावर प्रेम करणारे तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी यांनी काहि कारण न सांगता बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे महिला जिल्हा अध्यक्ष शिला उजगरे सचीव कमलाकर वेदपाठक बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष पद्ममीन तारडे, शालीन इंगळे, अंकुश सोनवणे, ढोबळे विक्रम, मोमीण, रमेश चव्हाण, संतोष आघाव, अशोक सोनवणे, अशोक गंडले, इब्राहिम गवळी, मुरली जानकर, सुनिता कदम, विक्रम आटोळे, रफिक शेख, विशाल नाळपे, गाडेकर पाटोदा, बालाजी घोळवे, यांसह बीड प्रहार पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा