Subscribe Us

header ads

लोककल्याणकारी राजश्री शाहू महाराजानीं प्रजेच्या हिताला सर्वोच्च प्रधान्य देऊन सामाजिक क्रांती केली--- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड स्पीड न्यूज 


लोककल्याणकारी राजश्री शाहू महाराजानीं प्रजेच्या हिताला सर्वोच्च प्रधान्य देऊन सामाजिक क्रांती केली--- नगरसेवक अँड विकास जोगदंड

बीड (प्रतिनिधी) 26 जुन समाजातील वंचित,उपेक्षित, बहुजन समाजाची प्रगती करायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहत आणले पाहिजे वंचित घटकाला शिक्षण मिळाले, तरच त्यांची परिपूर्ण प्रगती होईल म्हणून आपल्या संस्थानात मागासवर्गीय जाती जमाती बहुजनांना शिक्षणाची द्वारे खुली करत, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करून त्यावरील शैक्षणिक शुल्क माफ केले. तसेच आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना प्रतिमाह एक रुपया दंड लावण्याची कायदेशीर तरतूद केली. प्रत्येक गाव वस्तीत सुमारे पाचशे वा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास तेथे प्राथमिक शाळा स्थापन केल्या विविध योजना राबवत शिष्यवृत्या देऊन बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी त्यांनी संबंध जिवन प्रयत्न केले.सन 1901 मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिकटोरीया मराठा बोर्डिंग हाऊस स्थापित केले. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवून इतिहास रचला तसेच बहुजनानीं केवळ शेतकरी, सैनिक होऊन चालणार नाही तर उद्योग व्यापार क्षेत्रात ही उद्यमशील होणे गरजेचे असल्याने विविध उद्योगांना त्याकाळी शाहू महाराजांनी  प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता निवारण,जातीभेद निर्मूलन, बलुतेदार पद्धतीवर बंदी, स्त्री शिक्षण, महिला संरक्षण कायदा, महार वतन खालसा, देवदासी प्रथेचे उच्चाटन, सरकारी दप्तरावर वंश परंपरागत नेमणूक पद्धती रद्द करत, विधवा पुनर्विवाह व आंतर जातीय विवाहास प्रोत्साहन देत शाहू महाराजांनी आपल्या लोककल्याणकारी राज्यकारभारात सामाजिक न्याय प्रस्थापित करत प्रजेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन सामाजिक क्रांती केली. असल्यानेच आज वंचित उपेक्षित बहुजन समाज  प्रगतशील असल्याचे भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी तथागत सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित जयंती निमित्त अभिवादनपर उपस्थितांना संबोधित करतानां सांगितले. याप्रसंगी प्रथमता: राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदर्श जोगदंड यांनी केले.यावेळी जेष्ठ नागरिक किसन जोगदंड,मंगेश जोगदंड,विष्णू गायकवाड, राजेशभाई कोकाटे,दिपक सौदा,महादेव वंजारे, गोरख जोगदंड,आदित्य जोगदंड,लखन शिंदे,कमलताई जोगदंड,सारीकाताई जोगदंड,सविताताई जोगदंड,शिल्पाताई जोगदंड,विद्याताई जोगदंड,पूजाताई वंजारे, सह तथागत सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठाण चे पदाधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा